breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शहरातील विविध भागात जनजीवन विस्कळीत;अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान युद्धपातळीवर कार्यरत

पुणे : पुणे जिल्ह्यात आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. तसेच, काल सकाळी (24 जुलै) 07:00 वाजेपासून आज ((25 जुलै)  सकाळी 11:00 वाजेपर्यंत अग्निशमन दल नियंत्रण कक्षात शहरातील विविध भागातून वर्द्या आलेल्याआहे.

आत्तापर्यंत अग्निशमन दलाने जवळपास 160 नागरिकांची सुखरुप सुटका केली/सुरक्षित स्थळी हलविले आहे. बोटी, रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग असे विविध साहित्य वापरले. स्वत: मुख्यअग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी तसेच इतर वीस अग्निशमन अधिकारी व जवळपास तीनशे जवान विविध वर्द्यांवर कार्यरत आहेत.

अग्निशमन दलाने नागरिकांची केलेली सुटका

– रजपुत विट भट्टी, खिलारेवाडी – 31नागरिक

– वारजे तपोधाम – 48 नागरिक (ज्यामध्ये एक पॅरलिसिस झालेला मुलगा व एका गर्भवती महिलेचा समावेश)

– डेक्कन पुलाची वाडी – 15 नागरिक

– पाटील इस्टेट झोपडपट्टी – 10

– सिहंगड रोड, निंमज नगर – ७० नागरिक सुटका

हेही वाचा –  Positive Initiatives | नैसर्गिक आपत्तीच्या काळात आमदार महेश लांडगे यांची सतर्कता!

शहरात एकूण 63 झाडपडीच्या घटना घडल्या असून 3 ठिकाणी( (भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली व कोरेगांव पार्क, बर्निंग घाट नजीक भिंत पडली/खड्डा पडला – वडगावबुद्रुक) भिंत पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

तसेच एकूण 16 ठिकाणी  (वारजे, स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सोसायटीत – शिवणे, सदगुरू सोसायटीत – सिहंगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी व इतर तीन सोसायटीमध्ये – नदीपाञ रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीक, गंजपेठ, चांदतारा चौक – शिवाजीनगर, कर्वेनगर, पुलाची वाडी, पाटील इसटेट व इतर) पाणी साचल्याचे समजत आहे.

सद्यस्थितीत अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कार्यरत असून पाणी शिरलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याकामी कार्यवाही करीत आहेत.वरील सर्व घटनांमध्ये अद्याप कुठे ही जखमी वा जिवितहानी नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button