ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आदर्शनगर- मोशीतील रस्त्याला अखेर ‘ग्रीन सिग्नल’

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

पिंपरी : आदर्शनगर- मोशी येथील गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर निकालात निघाला आहे. सदर रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी जागा मालक विकसकासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामुळे आगाऊ ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुणे- नाशिक महामार्गाला जोडणारा आदर्शनगर- मोशी येथील गट नं. ४५३/१ व ४५४/१ पैकी क्षेत्र १२२००.०० चौ. मी. पैकी ६० मी. व १२ मी. रस्ता रुंदी क्षेत्र २८२६. ५६ चौ. मी. क्षेत्राचे प्रपत्र- अ करण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी जमिनीचा आगाऊ ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या भागातील सुमारे २५ हजार नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न निकालात निघाला आहे.

भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी २०१४ मध्ये मोशी कचरा डेपो परिसरातील ‘बफर झोन’ कमी करण्याबाबतचा मुद्दा निवडणुकीच्या अजेंड्यावर घेतला होता. त्यानुसार, राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन त्यांनी १०० मीटरपर्यंत बफर झोन कमी केला. परिणामी, ४०० मीटर बफर झोन हद्दीत पायाभूत सोयी-सुविधा निर्माण होण्यास गती मिळाली.

दरम्यान, आदर्शनगर- मोशी येथील रस्ता जागा ताब्यात नसल्यामुळे रखडला होता. यावर स्थानिक नागरिकांनी सदर रस्ता सुरू करण्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्याकडे मागणी केली होती. यावर आमदार लांडगे, जागामालक विकसक आणि प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक झाली. सामोपचाराने रस्त्यासाठी जागेचा ताबा देण्यात जमीन मालकांनी परवानगी दिली. त्यामुळे प्रपत्र- अ आणि जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली.

पावसाळ्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. किरकोळ अपघाताच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर होता. संबंधित विकसकाने ताबा दिल्यामुळे आगामी काही दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण होईल.

प्रतिक्रिया :
समाविष्ट गावांतील अंतर्गत रस्ते, डीपी रस्ते विकसित करण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिका घेतली. व्यापक जनहिताच्या भूमिकेतून जागामालक विकसक व भूमिपूत्र शेतकऱ्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आदर्शनगर- मोशीतील जागा मालकांचे यासाठी मनापासून आभार मानले पाहिजेत. कारण, त्यांच्या पुढाकारामुळे सुमारे २५ हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. समाविष्ट गावांच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button