breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

विराट कोहली-गौतम गंभीरबद्दल आशिष नेहराचं मोठं वक्तव्य; म्हणाला..

Ashish Nehra | गेल्या वर्षी आयपीएल दरम्यान गंभीर आणि कोहली यांच्यात मैदानावर वाद झाला होता. त्यानंतर यंदाच्या हंगामात दोघांमध्ये चांगले संबंध असल्याचे दिसून आले. कारण मैदानावर दोघे एकमेकांची गळाभेट घेताना दिसले होते. आता गौतम गंभीर श्रीलंका दौऱ्यापासून मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करत आहे. या कालावधीत कोहली देखील एकदिवसीय संघाचा भाग आहे. दरम्यान, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने विराट कोहली-गौतम गंभीरबद्दल दावा केला आहे.

आशिष नेहरा म्हणाला, विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघेही उत्साही लोक आहेत. जेव्हा-जेव्हा दोघेही संघासाठी खेळले, तेव्हा त्यांनी विरोधी संघाला अडचणीत आणले. आता जेव्हा ते ड्रेसिंग रूममध्ये एकत्र असतील, तेव्हा ते संघासाठी एकजूटीने काम करतील. कोहलीला १६-१७ वर्षांचा अनुभव असून गंभीरही खूप अनुभवी आहे. लोक बाहेर काय चाललंय ते लक्षात ठेवतात. हे फक्त विराट-गौतमबद्दल नाही. असे अनेक खेळाडू आहेत जे यापूर्वी मैदानावर एकमेकांशी भिडले आहेत, परंतु जेव्हा ते संघासाठी एकत्र येतात तेव्हा ते खेळाडू, प्रशिक्षक किंवा वरिष्ठ खेळाडू म्हणून त्यांचे संबंध चांगले असतात.

हेही वाचा     –    गुंतवणूक करुन कसा वाचवाल कर? जाणून घ्या ‘हे’ पर्याय..

गौतम गंभीर नेहमी स्पष्ट आणि पारदर्शक असतो आणि फक्त त्याच्या मनाचे ऐकतो. गौतम गंभीर स्पष्ट आणि पारदर्शक आहे ,जे चांगले आहे. तो त्याच्या मनाचे ऐकतो जे खूप महत्वाचे आहे. होय, मी सहमत आहे की प्रत्येकाची स्वतःची वेगळी कोचिंग शैली असते. मला कोहली आणि गंभीर यांच्यात कोणतीही अडचण दिसत नाही, विशेषत: दोघांची कारकीर्द पाहता, असंही आशिष नेहरा म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button