ताज्या घडामोडीपुणेराजकारण

‘लाडका भाऊ’ योजना राज्यातील युवकांची फसवणूक; विनायक राऊत यांचा हल्लाबोल

सोलापुरात ‘भगवा सप्ताहा’च्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात विनायक राऊत यांचे वक्तव्य

पुणे : लोकसभेतील पराभवाच्या धसक्याने राज्य सरकार कायदेशीर आधार नसलेल्या फसव्या योजना जाहीर करीत सुटले आहे. ‘लाडका भाऊ’ ही योजना त्यातीलच एक आहे. या योजनेमुळे तरुणांची कुचेष्टा आणि फसवणूक करण्यात येत आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी केला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी घवघवीत यश मिळवून सत्तेत येईल, असा जबरदस्त विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

सोलापुरात ‘भगवा सप्ताहा’च्या निमित्ताने सोलापूर शहर मध्य व सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित मेळाव्यात शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत बोलत होते.

विनायक राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याचे दाखवून दिले आहे. इंडिया आघाडीने राज्याबरोबरच देशातही मोठा विजय मिळविला आहे. येणाऱया विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 195हून अधिक जागा मिळणार असून, पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या कारभारावर टीका करताना राऊत म्हणाले, लोकसभेतील पराभवाच्या धसक्याने राज्य सरकार कायदेशीर आधार नसलेल्या फसव्या योजना जाहीर करीत आहे. ‘लाडका भाऊ’ ही योजना त्यातीलच एक आहे. या योजनेमुळे तरुणांची कुचेष्टा बरोबरच फसवणूक करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेतील पळवाटा उघड केल्यानेच मिंधे सरकारने ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर करत निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील युवकांची फसवणूक करीत आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

यावेळी उपनेत्या अस्मिता गायकवाड, शरद कोळी, सहसंपर्कप्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्ता वानकर, मोहोळच्या सीमा पाटील, जितेंद्र सपकाळ, डॉ. किशोर ठाणेकर, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, धनंजय डिकोळे, लोकसभाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी खासदार शिवाजीराव कांबळे, लोकसभा समन्वयक दीपक गायकवाड, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, आशा टोणपे, प्रशांत खंडाळकर, दीपक सुर्वे, शशिकला यिवडशेट्टी, पूनम अभंगराव यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button