breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘देवेंद्र फडणवीसांनी सलग 20 दिवस जागून मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा तयार केला’; चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या मुद्द्यावरुन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र  फडणवीस यांची भक्कमपणे पाठराखण केली. देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे  मारेकरी नाहीत. तर त्यांनीच सलग 20 दिवस जागून मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा तयार केला होता, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचा काम केले.मला आठवतो त्या ठिकाणी मुंबई मेट्रोचे प्रकल्प सर्व झाले मराठवाड्यासारखी वाटरगीचा प्रकल्प वाढला जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजी बंद करून टाकली मध्ये 18 योजना उद्धव ठाकरेंच्या सरकारने बंद पाडल्या जे उद्धव ठाकरे फक्त दोनच दिवस विधानमंडळात आले मुख्यमंत्री असताना जे उद्धव ठाकरे मंत्रालयात दोन दिवस झाले ज्यांच्या हातात प्रेमाचे नव्हता अशा उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्राचे बरबाद केले आणि

हेही वाचा – राज्यात अतिमुसळधार पाऊस, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश

आज महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे या राजकारणाला आपण सर्वांनी जशास तसे उत्तर दिले पाहिजे, सर्वांनी या विषयावर बोललं पाहिजे. सर्वांनी या विषयावर बुथपर्यंत आपल्या भागात जाऊन बोललं पाहिजे. आज ज्या पद्धतीने मला याठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम झाले. त्यावेळी जे काम झाले, मला आठवते, मी मंत्री होतो. त्या काळात देवेंद्रजींनी 20 रात्री जागून टिकणाऱ्या मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केला.  ते पहाटे चार वाजेपर्यंत जागायचे. आम्ही त्यांना म्हणायचो, तब्येतीची काळजी घ्या, असे बावनकुळे यांनी सांगितले.

आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की, मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला, विधिमंडळात मंजूर झाला, हायकोर्टात मंजूर झाला, पण जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या  कसा  कमजोर आहे, आर्थिक दुर्बलता त्याबद्दलचा भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मांडला नाही. सुप्रीम कोर्टात केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरेंनी जर चार चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्या दिवशी संपला असता आणि मग मराठा समाजाचे आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे? उद्धव ठाकरे आहेत. आज काय परिस्थिती आहे, सामाजिक आंदोलनाच्या नावाने देवेंद्रजींना व्हिलन केले जात आहे. सामाजिक आंदोलन झालं पाहिजे, सामाजिक आंदोलनाची गरज आहे, प्रत्येक समाजाला आपापल्या समाजाला हक्क मागण्याची गरज हक्क देण्याची गरज आहे. पण आंदोलन करताना ज्या पद्धतीने राजकीय स्मेल येत आहे. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. मराठा समाजाला 100% आरक्षण मिळावं, त्यांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी, महायुती पाठिंबा देत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पर्याय शोधत असताना दुसरीकडे देवेंद्रजींच्या काळात कायदा केला होता, त्या कायद्याचा मारेकरी शोधला पाहिजे. हेही करण्याची गरज आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button