breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘लाडक्या भावा’साठी महापालिकेची लगबग

पुणे : राज्यातील शिंदे सरकारने ‘लाडकी बहीण’ या योजनेनंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही नवी योजना सुरू केली आहे. ही योजना ‘लाडका भाऊ’ या नावाने ओळखली जात आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यातील महापालिकांना राज्य सरकारने कामे लावली आहेत. शहरातील कंपन्यांसोबत तसेच कंत्राटी कंपन्यांसोबत घेऊन तरुणांना अॅप्रेंटिसशिप मिळवून देण्यासाठी काम महापालिकेला काम करावे लागणार आहे. यामुळे एक प्रकारे महापालिकेकडून महायुतीच्या प्रचाराचे काम करून घेतले जाणार आहे.

राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. बहिणीसाठी योजना आणली पण बेरोजगार भावासाठी सरकारने काहीही केले नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला. त्यानंतर भावालाही अंतर देणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ ही योजना लागू केली आहे.

हेही वाचा   –    ऋतुराज गायकवाडला भारतीय संघातून वगळल्याने माजी दिग्गज संतापला; म्हणाला.. 

या योजनेमध्ये तरुणांना दरमहा तब्बल १० हजार रुपये दिले जाणार आहेत. तरुणांना बेरोजगारीतून मुक्त करण्यासाठी ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. महापालिका हद्दीतील कंपन्यांना एकत्रित करून भावासाठी अॅप्रेंटिसशिप मिळवून देण्याचे काम करावे लागणार आहे. अॅप्रेंटिसशिप मिळाल्यानंतरच भावाला या योजनेचा फायदा मिळणार आहे. त्यासाठी आता महापालिकेकडून कंपन्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला जाणार आहे. त्यानंतर नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी आता प्रशासनाला काम करावे लागणार असून १५ ते २० हजार भावांना अप्रेंटिसशिप मिळवून देण्याचे तोंडी टार्गेट देण्यात आल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी (दि. २२) याबाबत महापालिकेत बैठक घेतली जाणार असून पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने एकापाठोपाठ एक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण या योजनेनंतर  लाडका भाऊ योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सराकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी राज्यातील सरकारी विभागांची मदत घेतली जात आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार ६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि आर्थिक मदतही  दिली जाणार आहे.  याशिवाय प्रशिक्षणादरम्यान पुढील अभ्यासासाठी आर्थिक साहाय्यही देण्यात येणार आहे, जेणेकरून युवक व विद्यार्थ्यांना रोजगार मिळून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करता येईल. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल.

अशी करा ऑनलाइन नोंदणी

– लाडका भाऊ योजनेसाठी महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करता येते.

– वेबसाइटचे होम पेज ओपनवर नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल

– अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी

– आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडावी लागतील

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button