गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मागणीस शासनाचा हिरवा कंदिल
![5 percent reservation in government service for meritorious players](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Sports-780x470.jpg)
पुणे : राज्य शासणाच्या वतीने खेळाडूंना देण्यात येणारे ५% आरक्षण च्या प्रारूपबाबत चर्चा करण्यासाठी १९ जुलै २०२४ रोजी राज्याचे क्रीडा विभागाचे अप्पर सचिव श्री ओम प्रकाश गुप्ता याचे अध्यक्षतेखाली व क्रीडा आयुक्त श्री राजेश देशमुख यांचे उपस्थितीत आणि महाराष्ट ऑलिम्पिक असोसिएशन व राज्यातील प्रमुख संघटनांचे पदाधिकारी यांचे समवेत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे महत्वाची बैठक उत्साहात पार पडली.
या ५% आरक्षणच्या प्रारूपबाबत राज्य संघटनाच्या अनेक सूचना होत्या. महाराष्ट ऑलिम्पिक असोसिएशन व राज्य संघटनांनी या प्रारुपास तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते, या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावर सखोल चर्चा झाली. दोन्ही बाजूने आपली मते मांडली. मुद्देसूद सकारात्मक चर्चा होऊन महाराष्ट ऑलिम्पिक असोसिएशन व राज्य संघटनाचे सूचनांचा समावेश खेळाडू ५% आरक्षण शसन निर्णयामध्ये करण्याचे आश्वासन क्रीडा विभागाचे अप्पर सचिव ओम प्रकाश गुप्ता यांनी दिले.
तसेच या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर खेळाडूंच्या हितासाठी सदर शसन निर्णयामध्ये महाराष्ट ऑलिम्पिक असोसिएशन व राज्य संघटनांच्या सुचानाचा समावेश करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक श्री संजय सबनीस व महाराष्ट ऑलिम्पिक असोसिएशन व राज्यातील प्रमुख संघटनांचे पदाधिकारी यांनी पुढील ३० दिवसामध्ये बैठका घेऊन एकत्रित मसुदा तयार करावा व सदर मसुदा क्रीडा सचिव यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुढील बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्याचे ठरले.
बैठकीस उपस्थित मान्यवर…
या बैठकीसाठी शासनाच्या वतीने क्रीडा विभागाचे अप्पर सचिव ओम प्रकाश गुप्ता, उपसचिव सुनील हांजे, क्रीडा आयुक्त राजेश देशमुख, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक संजय सबनीस, सुहास पाटील, उदय जोशी व महाराष्ट ऑलिम्पिक असोसिएशनचेवतीने महासचिव नामदेव शिरगावकर, सहयोगी उपाध्यक्ष चंद्रजीत जाधव, रोइंग असोसिएशनचे सचिव संजय वळवी, फेन्सिंग असोसिएशनच्यावतीने प्रकाश काठोळे, तायक्वांदो असोसिएशनचे गफार पठाण, स्क्वाश असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खांडरे, आनंद लाहोटी, कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नगर, सचिव शिवाजी साळुंखे, रोलबॉल असोसिएशनचे राजू दाभाडे, सोफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, सोफ्टबॉल असोसिएशनचे सचिव प्रदीप तळवेलकर, तसेच अनेक क्रीडा संघटनाचे पदाधिकारी, खेळाडू व क्रीडा खात्यातील अधिकारी उपस्थितीत होते.