ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शिवसेना भोसरी विधानसभेचे पदाधिकारी जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी

भोसरीला दादागिरी, गुंडगिरी आणि भयमुक्त करण्याचा केला संकल्प

भोसरी : महाविकास आघाडी विधानसभेच्या जागा वाटपाचे धोरण ठरण्यापूर्वीच भोसरीमध्ये पक्षांतर सुरू झाले. त्यामुळे आक्रमक झालेल्या भोसरी विधानसभेतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेत भोसरीला दादागिरी गुंडगिरी आणि जंगल राजपासून भुईमुक्त करण्याचा संकल्प केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जेजुरीतील खंडेरायाचे दर्शन घेऊन विजयी संकल्पाचा भंडारा उधळला. जिल्हा संघटिका सौ. सुलभाताई उबाळे, धनंजय आल्हाट, तुषार सहाणे संतोष वाळके, सचिन सानप, युवराज कोकाटे, नेताजी काशीद, अनिल सोमवंशी, रावसाहेब थोरात, शैलेश मोरे, दादा नरळे, ऋषिकेश जाधव, राहुल भोसले, नितीन बोडें, सर्जेराव कचरे, स्वप्नील रोकडे, आशाताई भालेकर, प्रदीप सकपाळ, बाटे काका, शंकर चव्हाण, रमेश पाटोळे, योगेश जगताप, जनाबाई गोरे, दमयंती गायकवाड, अजिंक्य उबाळे, अमित शिंदे, अनिकेत येरूणकर, सुहास तळेकर, किशोर शिंदे, नरेंद्र पाटील, कुश कोकाटे आदी उपस्थित होते.
भोसरीत मशाल पेटवणार..!

यावेळी सुलभाताई उबाळे म्हणाल्या, भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा पारंपारिक क्लेम आहे. येथील कट्टर शिवसैनिकांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेत आपली कामगिरी चोख बजावली. ज्यामुळे येथे ‘तुतारी’चा आवाज घुमला. त्यामुळे आता भोसरी विधानसभेत शिवसेनेची मशाल पेटावी अशी आमची आग्रही मागणी आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमची मागणी मांडली. त्यांच्याकडून आम्हाला योग्य त्या सूचना मिळाल्या आहेत. आम्ही निष्ठावंत शिवसैनिकांनी जेजुरीच्या खंडेराया चरणी शपथ घेतली की, ज्या वर्षा बंगल्यातून आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना षडयंत्र रचून, छळ कपट करून बाहेर काढले, त्यांना पुन्हा सन्मानाने मुख्यमंत्री बनवून वर्षा बंगल्यात जल्लोषात नेण्याचा संकल्प आम्ही केला आहे.

भोसरी विधानसभेतील विजयी संकल्पचा ‘येळकोट’
आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा वारसा पुढे घेऊन जाताना भोसरीला दादागिरी, गुंडगिरी, जंगलराजपासून भयमुक्त करण्याचा संकल्प भोसरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी खंडेरायाचा भंडारा उधळत शिवसैनिकांनी भोसरी विधानसभेतील विजयी संकल्पचा ‘येळकोट’ केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button