ताज्या घडामोडीदेश-विदेश

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसणार

उपोषणाच्या आधीच 'जातीयवादी सरकार' म्हणत मनोज जरांगेंचा हल्लाबोल

जालना : मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सरकारने दिला अल्टीमेटम उद्या संपतोय याच मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी पुन्हा आरक्षणासाठी आंदोलनाला बसण्याची घोषणा केली आहे. उपोषणाआधी राज्य सरकार कडून कुणी आमदार किंवा मंत्री अंतरवाली सराटी येथे भेटायला आले असते तर भेटलो असतो असे म्हणत जरांगे यांनी सरकारबद्दल नाराजीचा सूर बोलून दाखवला.मराठ्यांना ओबीसी कोट्यात जाऊ न देण्याचा सरकारचा डाव,सरकार मराठ्यांचा घात करत आहे असा आरोप जरांगेंनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले, “काल आमदार राजेंद्र राऊत मला भेटायला आले होते त्यांनी उपोषणाआधी शंभूराज देसाई यांच्याशी मुंबईत भेट होईल असे सांगितले, मुंबईत भेटा म्हणून मला सांगितलं पण मी नकार दिला. छत्रपती संभाजीनगरला बैठकीसाठी जायला मी तयार झालो होतो पण शंभूराजे देसाई आज सातारा येथील कार्यक्रमात असल्याने ही बैठक शक्य झाली नाही” असे जरांगे म्हणाले.

उद्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार उद्या सकाळी 10 वाजेपासून आमरण उपोषणाला बसणार. मराठा कुणबी यांच्यात रोटी बेटी व्यवहार होतो त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी आमची मागणी आहे अशी भूमिका जरांगेंनी बोलून दाखवली. सध्या पोलीस भरतीत मराठा मुलांना जात प्रमाणपत्रामुळे अडचण येत आहे जातीयवादी अधिकारी मुद्दाहून अडथळे आणत आहेत. भरतीत मराठा मुलांचं वाटोळं होत आहे. मराठ्यांशी भरतीत डाव केले जात आहेत. भरतीत सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र देण्याची अट ठेवा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
जरांगे पाटील लांब राहिले, प्रसाद लाड यांनी हिंमत असेल तर आमच्या प्रश्नांना उत्तर द्यावी; मराठा बांधव

सर्व मुलींना शिक्षण मोफत केले तर मग अटी शर्थी कशाला ठेवल्या आहेत,सर्व अटी हटवा,ओबीसींच्या सवलती मराठ्यांचा मुलींना लागू करा असे जरांगे म्हणाले. लाडकी बहीण योजना काढून लोकांना आमिष द्यायला लागलेत का? असा सवाल जरांगेंनी केला तसेच इडब्ल्यूएस का बंद केलं,मराठ्यांच्या पोरांवर अन्याय करू नका,ईडब्ल्यूएस पुन्हा सुरू करा अशी मागणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button