ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवाजीवाडी-मोशी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी!

अंशूल ईला, ऋषभ व्हिला सोसायटीला हक्काचा रस्ता

पिंपरी : शिवाजीवाडी-मोशी रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे सदनिकाधारक आणि स्थानिक नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार, सदर कामाला तात्काळ सुरूवात करण्यात आली. त्यामुळे सुमारे ५०० सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.

Shivajiwadi, Moshi, Question, Margi, Anshul Ila, Rishabh Villa, Society, Rights, Road,
Shivajiwadi, Moshi, Question, Margi,
Anshul Ila, Rishabh Villa, Society, Rights, Road,

भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवाजीवाडी-मोशी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजेश सस्ते, अर्चना सस्ते, सुदाम तारसे, गणेश सस्ते, वंदना आल्हाट, विभद्र निरने, अजित सस्ते, सचिन सस्ते, राहुल सस्ते तसेच, चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, ऋषभ व्हिला सोसायटीचे चेअरमन व सदस्य उपस्थित होते.

शिवाजीवाडी, मोशी येथे अंशूल ईला सोसायटी, ऋषभ विला सोसायटी आणि राधाकृष्णनगर येथील रस्त्यांच्या कामांसाठी स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार, सदर रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. याबाबत सोसायटीधारकांनी आमदार लांडगे यांचे आभार मानले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका १९९७ मध्ये हद्द वाढ करण्यात आली. समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा विकसित करण्यासाठी २०१७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात समाविष्ट गावांच्या विकासाला चालना देण्यात आली. त्यामुळे ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित झाला. नागरीकरण वाढले. त्यामुळे वाडी-वस्तीवरील अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

प्रतिक्रिया :
भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये सोसाटीधारक पिंपरी-चिंचवडकरांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे देण्याबाबत आम्ही सकारात्मक भूमिकेतून सातत्त्यपूर्ण पाठपुरावा करीत आहोत. रस्ते, पाणी, वीज पुरवठा आणि कचरा अशा नागरी समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी ‘परिवर्तन हेल्पलाईन- 93 79 90 90 90’ वर संपर्क करावा. सोसायटीधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button