breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

यूपीएससीकडून पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे | प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या विरोधात अखेर यूपीएससीने कारवाई केली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा केला आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली आहे. यूपीएससीने परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे पूजा खेडकर यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

पूजा खेडकर यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यूपीएससीने प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यावरील आरोपाची सखोच चौकशी केली असून त्यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचं सिद्ध होत असल्याचे यूपीएससीने या परिपत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचा     –      अण्णाभाऊ हे फक्त शाहीर नव्हते ते तर मानवतेचे शाहीर; विश्वासराव पाटील 

दरम्यान, पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला होता. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button