breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अण्णाभाऊ हे फक्त शाहीर नव्हते ते तर मानवतेचे शाहीर; विश्वासराव पाटील

"भारतीय साहित्यातील अण्णा भाऊंचे क्रांतीकारक योगदान" या विषयावर महाचर्चा

पुणे | साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांचे “भारतीय साहित्यातील अण्णा भाऊंचे क्रांतीकारक योगदान” या विषयावर महाचर्चा या कार्यक्रमाचे आयोजन श्रमिक पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. तर प्रमुख वक्ते थोर विचारवंत, साहित्यीक विश्वासराव पाटील, विशेष आतिथी रविप्रकाश कुलकर्णी, प्रमुख अतिथी म्हणून आचार्य. रतनलाल सोनाग्रा होते. तर स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट होते.

भगवानराव वैराट प्रास्ताविकात म्हणाले की गेली २८ वर्ष झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेच्या माध्यमातून कामगार, कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी ही संघटना अहोरात्र कार्यरत आहे. ही चळवळ सातत्याने सक्रिय पद्धतीने काम करत आहे. यावेळी विशेष सत्कारमुर्ती  महेश शिंदे व मंजिरी स. धाडगे, दयासागर वानखेडे यांचा करण्यात आला. सोनाग्रा म्हणाले की अण्णा भाऊ साठे यांच्या सोबत मी काम केले आहे.

हेही वाचा     –        FASTag नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल; NHAI चा नवा नियम

विश्वासराव पाटील म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊ साठे यांचे योगदान वाखण्याजोगे आहे. “माझी मैना गावावर राहील माझ्या जीवाची होतेय कायली” ही छकड त्यांनी लिहली. खऱ्या अर्थाने अण्णा भाऊ हे निसर्गपुत्र होते. त्यांच्या साहित्यातून निसर्गाची त्यातील विविध घटकांची माहिती मिळते. अण्णाभाऊ हे फक्त शाहीर नव्हते तर ते मानव तेचे शाहीर होते हे आपल्याला विसरून चालणार नाही. ते पुढे म्हणाले की जगातले सगळे देव वाटेगावात आहेत. शंकर म्हणजे वाटेश्वर आणि वाटेश्वरचे ठिकाण म्हणजे वाटेगाव पूर्वीच्या काळात हिमालयापासून जी वाट खाली जाते ती  रामेश्वरला त्या वाटेमध्ये येणार तीर्थयात्रींच गाव म्हणजे वाटेगाव होय.

श्रीपाल सबनीस म्हणाले की, अण्णाभाऊ हे मार्क्सवादी संस्काराचे होते. परंतु त्यांनी कधीही जातीवादाचे समर्थन केले नाही आणि ते करू शकत नाहीत पण त्यांनी जातीच्या पलीकडला अस्सल माणूस त्यांनी शोधलेला आहे. जगात गाजवलेली जगात गाजलेली आणि जगाला कवेत घेणारी शाहिरी अण्णा भाऊंनी लिहिली. रशियाला अण्णा गेल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला. मराठी मातीचा, मराठी भाषेचा अभिमान किती मराठी माणसाला असावा. हे त्यांनी दाखवून दिले. कार्यक्रमाचे आभार अविनाश गोडबोले यांनी मानले तर सूत्रसंचालन शलाका पाटील यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button