ताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

गडचिरोलीतील सूर्यापल्ली गावात, शाळेत शिरले पाणी

शाळेतील 120 विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकली, रात्रभर चालले रेस्क्यू

गडचिरोली : राज्यात सर्वत्र मान्सूनने जोर धरला आहे. मुंबई आणि कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. परंतु आता विदर्भातही अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सूर्यापल्ली गावात व माडेल शाळेत गुरुवारी तलावाचे पाणी शिरल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. सिरोंचा तालुक्यातील रामजापूर येथील माडेल शाळेत तीन ते चार फूट पाणी शिरले. या जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सूर्यापल्ली गावात शाळेत दुपारपासून पाणी शिरू लागले. पाण्याचा वाढत्या वेगामुळे 120 विद्यार्थी शाळेत अडकले. पाऊस कमी होण्याची वाट पालक आणि प्रशासन पाहत होते. अखेरी रात्री पाऊस कमी झाल्यानंतर रेस्क्यू ऑपेरशन सुरु करण्यात आले. रात्री दोन वाजता सर्व विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आले.

गडचिरोलीत शाळेत पाणी
शाळेत 120 विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू करावे लागले. पोलीस निरीक्षक व त्यांचे टीमने जवळपास 120 विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. कारमेल शाळेतून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयमध्ये या विद्यार्थ्यांना सुरक्षित हलविण्यात आले. रात्रीच्या अंधारात हे ऑपरेशन सुरु होते. रात्रभर पाऊस सुरु असताना हे रेस्क्यू करावे लागले. सर्व विद्यार्थी सुखरुप निघाल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला.

सुर्यापल्ली गावात घरांमध्ये पाणी
सिरोंचा तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुर्यापल्ली गावात जवळपास 14 घरांमध्ये तलावाचे पाणी शिरल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यात रेड आलात असून मुसळधार पाऊस सुरू आहे. परभणी जिल्ह्यातील आठवड्यात सातत्याने पाऊस होत असल्याने कापूस आणि सोयाबीन पिके चांगलीच बहरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केला जात आहे.

आज पुन्हा मुसळधार पाऊस- आयएमडी
काही विद्यार्थ्यांना रेस्क्यू टीमने खाद्यांवर घेऊन बाहेर काढले. दुपारपासून शाळेत विद्यार्थी अडकले असल्यामुळे त्यांच्या खाण्याची व्यवस्थाही संध्याकाळी करण्यात आली. गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे पालक वर्ग चिंतेत होते. आता पुन्हा गडचिरोली जिल्ह्यास पावसाचा रेड अलर्ट आयएमडीने दिला आहे. शुक्रवारी बंगालच्या खाडीत एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.

हे ही वाचा काम असेल तरच घराबाहेर पडा, राज्यात अती मुसळधार पावसाचा इशारा, सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button