US : कावानाह यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची शपथ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/1-1-2.jpg)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ब्रेट कावानाह यांनी शपथ घेतली. सिनेटने 50 विरुद्ध 48 मतांनी 53 वर्षीय कावानाह यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी कावानाह यांना 114वे न्यायाधीश म्हणून शपथ दिली.
कावानाह हे न्यायमूर्ती केनेडी यांची जागा घेतील. न्या.केनेडी यांनी या वर्षी निवृत्तीची घोषणा केली होती. न्या.कावानाह यांच्या शपथविधीसह सत्ताधारी रिपब्लिकन आणि विरोधी डेमोक्रेटिक पक्ष यांच्यात गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरु असलेला संघर्ष संपला आहे. न्या. कावानाह यांच्यावर 3 महिलांनी लौंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीसंदर्भात अडचणी वाढल्या होत्या.
दरम्यान, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कावानाह यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या. मी त्यांचे अभिनंदन करतो. विरोधी पक्षामुळे गेल्या काही दिवसात त्यांना व त्यांच्या कुटुंबियांनी खुप काही सहन करावे लागले, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात 9 सदस्य आहेत. त्यापैकी दोन सदस्यांची नियुक्ती ट्रम्प यांनी केली आहे. तर माजी अध्यक्ष बराक ओबामा यांन 2009 व 2010मध्ये दोन महिला न्यायाधीशांची नियुक्ती केली होती.