राजकारणात चांगल्या दृष्टिकोणाचा अभाव – राज ठाकरे
![Non-bailable warrant against MNS president Raj Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/235794-raj-thakre485.jpg)
ठाणे : डोळ्यांचे डॉक्टर नागरिकांना चांगली दृष्टि देण्याचे महत्वपूर्ण काम करतात मात्र राजकारणात चांगल्या दृष्टिकोणाचा अभाव आहे. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. आज, मानपाडा येथील श्री रामकृष्ण नेत्रालयाच्या ड्राय आय क्लिनिकचे या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चांगली दृष्टि देणाऱ्यामंडळीची राजकारणात गरज आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी, राजकारणात चांगल्या दृष्टिकोणाचा अभाव आल्याने जवळ असलेले दिसत नाही. असे राजकीय दृष्टिकोनाविषयी आपले परखड मत मांडले. ड्राय आय क्लिनिक सुरु झाल्याने याचा लोकांना चांगला फायदा होईल. या प्रसंगी त्यांनी, लहान मूलांनी मोबाइलचा वापर कमी करावा. त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यांच्या अजाराच्या समस्या सूटतील असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर प्रसार मध्यामांशी बोलायला त्यांनी नकार दिला. यावेळी, ड्राय आयची समस्या वाढत असून यासाठी विशेष क्लिनिकची आवश्यकता असल्याने हे क्लीनिक सुरु केले असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.