breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Y. C. M. Hospital | पालिका रुग्णालयांत ऑनलाइन पेमेंटला ठेंगा

कॅशलेस सुविधा नसल्याने नागरिकांची होत आहे गैरसोय

पिंपरी : ऑनलाइन पेमेंटच्या जमान्यात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या केवळ रोखीनेच बिलांची रक्कम स्विकारली जात आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये येणार्या नागरिकांना सोबत रोकड घेऊनच यावे लागत आहे. त्यातच सुट्ट्या पैशांची चणचण जाणवत असल्याने त्यावरुन वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. एका अर्थाने महापालिका रुग्णालयांमध्ये ऑनलाइन पेमेंटला ठेंगा दाखविला जात आहे.

तुलनेत महापालिका करसंकलन आणि पाणीपुरवठा विभाग येथे मात्र ऑनलाईन आणि युपीआय अशा दोन्ही पर्यायाने कराचा भरणा घेतला जात आहे. बांधकाम परवानगी विभागाकडून ऑनलाईन परवानगी शुल्क स्विकारणची सोय आहे. तथापि, युपीआय आणि कार्ड स्वाईप करुन रक्कम जमा करण्याच्या सुविधेकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.

हेही वाचा     –   ‘छगन भुजबळ कलाकार तर शरद पवार मोठे..’; संजय राऊतांचं विधान चर्चेत

त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या डिजिटल पेमेंट वाढले आहे. खिशात रोख रक्कम बाळगण्याऐवजी नागरिक मोबाईलवरील विविध ऑनलाईन पेमेंटची सुविधा देणार्या अ‍ॅपच्या माध्यमातुन व्यवहार करत आहेत. महापालिकेच्या यंत्रणेमध्ये या सुविधेचा किती वापर घेत आहे, याची माहिती घेतली असता त्यामध्ये महापालिकेची रुग्णालये सर्वाधिक मागे असल्याचे चित्र पुढे आले आहे.

महापालिकेची शहरामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह 8 रुग्णालये आहेत. त्याशिवाय, अजमेरा कॉलनी येथे नेत्र रुग्णालय आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये केसपेपर, औषधांसाठी आकारले जाणारे शुल्क व अन्य विविध शुल्क देण्यासाठी सध्या केवळ रोख रक्कम स्वीकारली जात आहे. ऑनलाइन व्यवहार वाढले असल्याने रोखीने होणारे व्यवहार कमी झाले आहेत. पर्यायाने, नागरिकांचे सुट्ट्या पैशांवरून वाद होत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button