breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयाबद्दल पिंपरी-चिंचवड भाजपकडून “आनंदोत्सव”

पिंपरी : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांना लाडू वाटप करत विजयी जल्लोष करण्यात केला. पिंपरी-चिंचवड शहराला अमित गोरखे यांच्या रुपाने भाजपने आणखी एक आमदार दिल्याबद्दल सर्वांनी पक्षाचे व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.

विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे, अमित गोरखे, योगेश टिळेकर, परिणय फुके, शेतकरी नेते सदाभाऊ खोत तसेच शिवसेनेचे कृपाल तुमाने, श्रीमती भावना गवळी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल पिंपरी-चिंचवड भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पिंपरी-चिंचवडमधील अमित गोरखे यांच्या रूपाने मातंग समाजाला न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे या आनंदावेळी विशेष आभार मानण्यात आले.

हेही वाचा – लोणीकाळभोरमध्ये सापडला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’; दहावी पास तोतया डॉक्टराला पकडले

यावेळी प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, सरचिटणीस विलास मडेगिरी, शीतल शिंदे, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, सोमनाथ भोंडवे, संतोष तापकीर, संदीप नखाते, निलेश अष्टेकर, प्रसाद कस्पटे, माजी नगरसेवक अनुराधा गोरखे, युवा मोर्चा प्रदेश तेजस्विनी कदम, दीपक मोढवे, नंदू भोगले, प्रकाश जवळकर, कविता हिंगे, शर्मिला बाबर, कमल घोलप, बिभीषण चौधरी, सुरेश भोईर, विठ्ठल भोईर, दत्ता यादव, खंडू देवकथोरे, गणेश वाळुंजकर, अभिजित बोरसे, योगेश चिंचवडे, पोपट हजारे, आनंद देशमुख, दीपक भंडारी, एड. दत्ता झुळूक, भूषण जोशी, कैलास सानप, संदेश गादिया, देवदत्त लांडे, मुकेश चुडासमा, सुरेश गादिया, सीमा चव्हाण, अश्विनी कांबळे, संजय परळीकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मोर्चा/ आघाडी/ प्रकोष्ठ प्रमुख, मंडल पदाधिकारी, विधानसभा वॉरियर्स, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते तसेच, पिंपरी चिंचवड मातंग समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले कि, सर्व सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी नेहमीच न्याय देते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मोठे यश मिळाले आहे. महायुतीचे हे यश पुढील काळामध्ये असेच अबाधित राहणार आहे. विधानपरिषदेच्या या यशामुळे सर्व कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला असून, आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय निश्चित आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हे यश मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाने सर्व समाजाला समान न्याय देण्याचे काम केले आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात अंत्योदय या ब्रीद वाक्यानुसार लोकोपयोगी योजना सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लखपती दीदी, विद्यार्थ्यांसाठी शिष्युवृत्ती योजना, भावांसाठी शिष्युवृती अशा योजना येत्या काळात जनतेपर्यंत पोहोचविणार असून, विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button