breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढली

पुणे : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडले. जागा ११ आणि उमेदवार १२ दिल्याने या निवडणुकीत ट्विस्ट पाहायला मिळाला. घोडेबाजार होऊ नये यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून काळजी घेण्यात आली. भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. भाजपाकडून पंकजा मुंडे २६ मतं, परिणय फुके २६ मतं ,अमित गोरखे २६ मतं, योगेश टिळेकर २६ मतं, सदाभाऊ खोत २४ मतं मिळवून विजयी झाले आहेत. दरम्यान योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांच्या विजयाने पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

हेही वाचा –  बांधकाम मजुरांसाठी मोफत गृहोपयोगी वस्तू संच योजना

योगेश टिळेकर मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत २ हजार ८२० मतांनी पराभूत झाले होते. २०१४ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा झालेला आहे. टिळेकर यांनी ‘भाजयुमो’चे प्रदेशाध्यक्ष पदही भूषविले आहे. यावेळी ते हडपसरमधून प्रबळ दावेदार होते विधानपरिषदेत ते आमदार म्हणून गेल्यामुळे पुण्यात भाजपची ताकद आणखी वाढलेली आहे.

तर पिंपरी चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि महेश लांडगे  हे भाजपचे आमदार आहेत. तर, भाजपच्याच उमा खापरे विधानपरिषदेत आमदार आहेत. आता अमित गोरखे हे विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. गोरखे यांच्या रुपाने भाजपला चौथा तर शहराला पाचवा आमदार मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अण्णा बनसोडे पिंपरीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button