ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

पंकजा मुंडे विजयी, वरळीपासून परळीपर्यंत जल्लोष!

विधान परिषदेवर निवडून आल्याने त्या मंत्री होणार का?

वरळी : आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेत पोहोचल्या आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांनी विजयासाठी आवश्यक 23 मते घेऊन विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे विजयी झाल्याने वरळीपासून परळीपर्यंत जल्लोष करण्यात येत आहे. पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आल्याने त्या मंत्री होणार का? अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान झालं. 12 उमेदवार रिंगणात असल्याने विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत काय होणार? अशी चर्चा होती. खासकरून सतत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या पंकजा मुंडे यांचं काय होणार? अशी चर्चा सुरू होती. संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीत पंकजा मुंडे या 23 मते घेऊन निवडून आल्या आहेत. त्यामुळे अखेर पंकजा मुंडे यांचा संसदीय राजकारणात प्रवेश झाला आहे.

धाकधूक वाढली
पंकजा मुंडे यांना पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत आधी एक, नंतर 6, नंतर 7 आणि 10 मते मिळाली. संथगतीने पंकजा मुंडे यांची मते वाढत असल्याने धाकधूक वाढली होती. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांचे चेहरे खिन्न झाले होते. पण पंकजा मुंडे यांनी मतांचा आवश्यक कोटा पूर्ण करून विजय मिळवताच सर्वांचे चेहरे खुलले.

आणि जल्लोषाला सुरुवात
पंकजा मुंडे यांचा विजय झाल्याचं कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. वरळी या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानापासून परळीपर्यंत जल्लोष करण्यात आला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

सर्वांना होती धाकधूक
पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं नव्हतं. मात्र, त्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी देण्यात आली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीटही देण्यात आलं. पण या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं राजकीय करिअर धोक्यात आल्याची चर्चा होती. पण पक्ष नेतृत्वाने पंकजा मुंडे यांना थेट विधान परिषदेचं तिकीट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button