ताज्या घडामोडीमुंबई

शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांचा सूनेवर गंभीर आरोप

सूना निघून जातात, त्यांच्या हातात सम्मान देऊ नये, अंशुमनच्या आई-वडिलांच दु:ख

मुंबई : “माझ्याकडे ना सून आहे, ना मुलगा…आणि ना तो सम्मान (किर्ती चक्र) जे हातात घेऊन पाहू शकीन किंवा फोटो काढता येईल. आमच्या यूपी, बिहारमध्ये सुना अशा नसतात. त्या आमच्यासोबतच राहतात….” हे शब्द आहेत, किर्ती चक्राने सम्मानित झालेल्या शहीद अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांचे. 5 जुलैला कॅप्टन शहीद अंशुमन सिंह यांना मरणोपरांत किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं. शहीद अंशुमन यांची आई आणि त्यांची पत्नी हा सम्मान स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनात आलेल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह यांना किर्ती चक्राने सन्मानित केलं. सोबत अंशुमन यांची आई होती. अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी सुनेवर गंभीर आरोप केलाय. अंशुमन सिंहची आई मंजू सिंह म्हणाल्या की, “पाच महिन्याच लग्न होतं. मुलगा शहीद झाला. सून किर्ती चक्र घेऊन माहेरी निघून गेली. आमच्याकडे काय उरलं?. अशी बरीच प्रकरण घडतायत. सूना पळून जातायत. त्यांच्या हातात सम्मान देऊ नये. राहुल म्हणालेत की, ते राजनाथ सिंह यांच्याशी बोलतील”

‘कारण सूना निघून जातात’

शहीद कॅप्टन अंशुमन सिंहचे वडील रवी प्रताप सिंह म्हणाले की, ‘सून कीर्ती चक्र घेऊन गेली. बस, फक्त मुलाचा फोटो उरलाय’ “सरकारने एकदा NOK च्या मुद्यावर विचार करावा. कारण सूना निघून जातात. असं बऱ्याच ठिकाणी झालय” असं शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांच म्हणण आहे.

तेराव्या पर्यंत सोबत राहिली

“आम्ही आमच्या सूनेवर प्रेम करायचो. माझी सून सुंदर होती. चांगली होती. माझी सून आणि मुलगी नोएडामध्ये एकत्र रहायचे. सूनेला जेवण किंवा चहा बनवणं नाही जमायचं. म्हणून मी माझ्या मुलीला सूनेकडे पाठवलं. माझा मुलगा ड्युटीवर गेला. त्यानंतर 4 महिने मी सूनेसोबत राहीली. माझा मुलगा शहीद झाल्यानंतर सून तेराव्या पर्यंत देवरियाच्या घरी राहिली. तेराव्याला तिच्या कुटुंबियांनी सांगितलं की, धार्मिक कार्यक्रमासाठी मुलीला घेऊन चाललेत. लवकरच परत आणून सोडू” असं अंशुमन यांच्या आईने सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button