breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संजय गांधी निराधार योजनेतील गरजू महिलांचा लाडकी बहिण योजनेत समावेश करा

कष्टकरी संघर्ष महासंघाची मागणी

पिंपरी :  महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र सदरच्या योजनेमधून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वगळण्यात आलेले आहे हे अन्यायकारक असून विधवा या एकल महिला पतीच्या निधनानंतर त्यांचे जीवन संघर्षाचे असून मुलांचे शिक्षण , घर खर्च भागवणे, जिकरिचे होते म्हणून त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली हा तर त्यांचा हक्कच आहे म्हणून त्यांचा यात समावेश करावा अशी मागणी केली.

याबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच कामगार मंत्री, तहसीलदार पिंपरी चिंचवड यांना निवेदन देण्यात आले आहे यात नमूद करण्यात आले आहे की महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. विधवा कष्टकरी घरेलू कामगार यांचा संजय गांधी निराधार योजनेत लाभ घेत असल्याने समावेश नाकारण्यात आला आहे मात्र त्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे विधवा निराधार घरेलू कामगार कष्टकरी कामगार या महिलांचा सदर योजनेत समावेश करावा त्याही लाडक्या बहिणी आहेत अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज निवेदनाद्वारे करण्यात आले कष्टकरी कामगार महिलांचे जीवन असुरक्षित असून पतीच्या निधनानंतर त्यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागते जगण्यासाठी धडपड म्हणून ते कुठेतरी काम शोधतात, मात्र कामाची हमी नसते अशा उपेक्षित, कष्टकरी महिला, घरेलू कामगार सर्व विधवा यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे त्यांना वगळण्यात आले आहे

हेही वाचा –  डुडूळगाव येथे इको टुरिझम पार्कबाबत वनमंत्र्यांची बैठक!

ज्यांचे कुटुंब सदन आहे ज्यांच्या कुटुंबात अनेक व्यक्ती कमावती आहे यांची तुलना विधवा महिलांशी होऊ शकत नाही त्यांची आर्थिक अडचण नेहमीच आहे म्हणून सदरची लाडकी बहीण योजना या वर्गासाठीही सुरू करण्या अत्यंत गरजेचे आहे. संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारे सहाय्यही कमी असून त्यांची मुले व कुटुंब चालवणे अत्यंत अडचणीचे होत असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांसाठी त्यांचाही समावेश करण्यात यावा.

महिलाअध्यक्षा माधुरी जलमूलवार,समन्वयक मायाताई शेटे,लता गोरे ,पुनम वारे ,ज्योती पाखले आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button