Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘बारावा खेळाडू मिलिंद नार्वेकर, त्याला कमजोर समजू नका’; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

मुंबई | विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान पार पडणार आहे. ११ जागांसाठी १२ अर्ज आल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदान फुटण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक सूचक विधान केलं आहे. बारावा खेळाडू मिलिंद नार्वेकर यांना कमजोर समजू नका, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणुकीत १२ वा उमेदवार दिल्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली आहे. मात्र, मॅच फिक्सिंग कोण करतंय? याकडे थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून येतील, शिवसेना शिंदे गटाचेही सर्वजण निवडून येतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही सर्व उमेदवार निवडून येतील. मग फूट कोणात पडेल? काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात फूट पडेल. पण तरीही धक्का कोणाला बसेल? हे मतदानानंतरच समजेल.

हेही वाचा     –      ‘माझं मत शिंदेंना, शिंदेंचं एकही मत फुटणार नाही’; बच्चू कडू यांचं विधान

विधानपरिषदेच्या निवडणुकीत १२ उमेदवारांपैकी कमजोर कोण वाटतं? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आता या सर्व निवडणुकीचं गणित आज समजेलच. कारण कोणी मते फोडली असतील तर ते सांगणार नाहीत. तसेच जो फुटला तोही सांगणार नाही. मग याचा निकाल कसा लागणार? तर ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी हे सर्व समोर येईल. मात्र, हे निश्चित आहे की १२ वा जो खेळाडू आहे, मिलिंद नार्वेकर यांना तुम्ही कमजोर समजू नका. मिलिंद नार्वेकर कमजोर नाहीत. विधानपरिषदेची पायरी चढण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतील. याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button