जुलै महिन्यात ‘या’ चार तारखा अत्यंत महत्त्वाच्या, आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक नियम बदलणार!
July Financial Schedule | जुलै महिन्यात आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक नियम बदललेले आहेत. बँकांच्या विविध क्रेडीट कार्डच्या सेवांसंदर्भातील नियमांशिवाय मोबाईल वॉलेटच्या नियामांपर्यंत नेमके आर्थिक व्यवहारांशी संबंधित काय काय बदलणार हे जाणून घेऊया. १ जुलै, १५ जुलै, २० जुलै आणि ३१ जुलै या चार तारखा जुलै महिन्यामध्ये महत्त्वाच्या आहेत.
१ जुलैपासून एसीबीआय क्रेडिट कार्टचे नियम तसेच ICICI बँकेचे क्रेडिट कार्डचे नवे शुल्क लागू होणार आहे. त्याचबरोबर एसबीआयने काही क्रेडिट कार्ड्सव रिवॉर्ड पॉइंट्स न देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांनी घेतलं ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन
१५ जुलैपर्यंत सिटीबँक क्रेडिट कार्डच्या अॅक्सिस बँकमधील मायग्रेशनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
२० जुलैपासून पेटीएम पेमेंट्स बँक डिअॅक्टिव्हेट झालेले वॉलेट्स बंद करणार आहे. हे सर्व वॉलेट्स बंद होण्याआधी ३० दिवस नोटीस दिली जाणार आहे.
३१ जुलैपर्यंत तुम्हाला २०२३-२४ तुम्हाला आयटीआर भरता येणार आहे. त्यानंतर दंड भरावा लागेल.