दहावी पास असाल तर भारतीय पोस्ट खात्यात तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी भरती
![If you have passed 10th, recruitment for about 35 thousand posts in Indian Post Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/India-Post-Recruitment-2024-780x470.jpg)
India Post Recruitment 2024 | भारतीय पोस्ट खात्यात देशातील २३ वेगवेगळ्या सर्कलसाठी ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीद्वारे तब्बल ३५ हजार पदे भरली जाणार आहे. याबाबतची जाहिरात येत्या १५ जुलै २०२४ रोजी जाहीर होणार आहे. असे अधिकृतरित्या सांगण्यात येत आहे.
सध्या या भरतीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. बाकी भरती प्रक्रियेची प्रक्रिया ही १५ जुलै २०२४ पासून सुरू होईल आणि सविस्तर माहिती देखील मिळेल. जे उमेदवार पोस्टाच्या परीक्षेसाठी तयारी करत आहे. त्यांच्यासाठी मोठी संधी असणार आहे. लिंक ओपन झाल्यानंतर उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
हेही वाचा – Pimpri Chinchwad | सात जणांच्या टोळीने गुन्हेगाराची धारदार शस्त्राने वार करून हत्या
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. [indiapostgdsonline.gov.in](http://indiapostgdsonline.gov.in/). या साईटवर जाऊन तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि येथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. 15 जुलैनंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.