अफगाणिस्तानची बांगलादेशवर विजय मिळवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री, ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट
![Afghanistan enter the semi-finals with a win over Bangladesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/AFG-vs-BAN-780x470.jpg)
T-20 World Cup | अफगाणिस्तानने बांगलादेशचा ९ धावांनी पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानने टी-२० विश्वचषक २०२४ च्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर केले आहे.
सामन्याच्या सुरूवातीपासूनच पावसाचा लपंडाव सुरू होता, तर वाराही सामन्यात व्यत्यय आणत होता. अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अफगाणिस्तानने २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून ११५ धावा केल्या.
हेही वाचा – महिला-केंद्रित ग्रामविकासांतर्गत “दृष्टा” डिजिटल फॅशन डिझाईन प्रकल्पाचे आयोजन
बांगलादेशला विजयासाठी डीएलएसनुसार १९ ओव्हरमध्ये ११४ धावांचं सुधारित आव्हान मिळालं होतं. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी या धावांचा शानदार बचाव करत बांगलादेशला १७.५ ओव्हरमध्ये १०५ धावांवर ऑलआऊट केलं.