breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी
मोफत आधारकार्ड अपडेट करण्याच्या मुदतमध्ये पुन्हा वाढ!
![Free Aadhaar card update deadline extended again](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Adhar-Card-Update-780x470.jpg)
Adhar Card Update | नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. ग्रामीण भागात इंटरनेट, वीजेचा त्रास पाहता ही मुदत वाढ केली आहे.
कोणत्या तारखेपर्यंत करता येणार मोफत आधारकार्ड अपडेट
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची यापूर्वीची तारीख १४ मार्च २०२४ होती. त्याला १४ जून २०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. ही डेडलाईन जाताच सरकारने पुन्हा एकदा मुदत वाढीचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – OBC आंदोलनावर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय? संजय राऊत म्हणाले..
त्यानुसार आधारकार्ड धारकांना आता १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत मोफत आधारकार्ड अपडेट करता येणार आहे. अशी माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिली आहे. तसेच ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे.