जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, गोळीबारात १ दहशतवादी ठार
![Another terrorist attack in Jammu and Kashmir, 1 terrorist killed in firing](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Jammu-and-Kashmir-Terror-Attack--780x470.jpg)
Jammu and Kashmir Terror Attack | ९ जून रोजी जम्मू काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यात शिव खोडी या तीर्थस्थळाकडे जाणारी बस दरीत कोसळली. बसवर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ती बस दरीत कोसळली. या हल्लात १० भाविकांनी आपला जीव गमावला आहे. तर ३३ जण जखमी झाले. आता ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी आणखी एका ठिकाणी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. या चकमकीत भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्तुरात १ दहशतवादी ठार झाला आहे. तर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. यासंदर्भातील माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिसांकडून रात्री उशीरा देण्यात आली.
हेही वाचा – चित्रपटानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने शाळा, कुठे अन् कोणी घेतला निर्णय
https://x.com/ANI/status/1800702888072675746
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांच्या बसवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. त्यांनी दिलेल्या संदेशात पर्यटक आणि गैरस्थानिकांना अशा प्रकारच्या हल्ल्यांचा इशारा दिला आहे. TRF ला २०२३ साली भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे.