नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार, शपथविधीची तारीख, वेळ ठरली!
![Narendra Modi will be the Prime Minister for the third time](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Narendra-Modi-3-780x470.jpg)
नवी दिल्ली | नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. येत्या ९ जून २०२४ ला संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली आहे.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली.
हेही वाचा – कपिल पाटीलांचा पराभव जिव्हारी, भाजपच्या कार्यकर्त्याची आत्महत्या
एनडीएच्या खासदार, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. २०२४ च्या लोकसभा निकालानुसार, एनडीए आघाडीने २९४ जागांवर विजय मिळाला असून, त्यापैकी भाजपने २४० जागांवर विजय मिळवला आहे. तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत.