‘धनराज पिल्ले-दिलीप तिर्की’ संघांमध्ये प्रदर्शनीय सामना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/hocky-1.jpg)
भुवनेश्वर- येत्या 28 नोव्हेंबर रोजी सुरू होत असलेल्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी खास नूतनीकरण करण्यात आलेल्या कलिंगा हॉकी स्टेडियमच्या उद्घाटनासाठी धनराज पिल्ले व दिलीप तिर्की या माजी हॉकीपटूंच्या नेतृत्वाखालील दोन संघांमध्ये प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या 10 ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या या सामन्यातील प्रतिस्पर्धी संघांमध्ये सरदार सिंग, वीरेन रॅस्क्विन्हा, दीपक ठाकूर, पीआर श्रीजेश, मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग अशा आजी-माजी खेळाडूंचा समावेश आहे. ओडिशा हॉकी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील अनेक प्रमुख सामने याच स्टेडियमवर पार पडणार आहेत. हॉकीच्या प्रसारासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल ओडिशा हॉकी संघटना आणि ओडिशा राज्य शासनाची धनराज पिल्लेने प्रशंसा केली.
प्रतिस्पर्धी संघ-
धनराज पिल्ले संघ- धनराज पिल्ले (कर्णधार), पीआर श्रीजेश (गोलरक्षक), वीरेन रॅस्क्विन्हा, सरदार सिंग, प्रभज्योत सिंग, संदीप सिंग, वरुण कुमार, हरमनप्रीत सिंग, गुरिंदर सिंग, कोठाजित सिंग, जरमनप्रीत सिंग, चिंगलेनसाना सिंग कांगुजाम, सिमरनजीत सिंग, हार्दिक सिंग, एसव्ही सुनील, गुरजंत सिंग, दिलप्रीत सिंग व प्रदीप सिंग, प्रशिक्षक- हरेंद्र सिंग.
दिलीप तिर्की संघ- दिलीप तिर्की (कर्णधार), कृष्णबहादूर पाठक (गोलरक्षक), इग्नेस तिर्की, व्हीआर रघुनाथ, दीपक ठाकूर, मनप्रीत सिंग, दिपसान तिर्की, रूपिंगरपाल सिंग, सूरज करकेरा, नीलम संजीप झेस, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, सुमित, नीलकांत शर्मा, ललित कुमार उपाध्याय, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग व सुमित कुमार, प्रशिक्षक- ख्रिस सिरिएलो.