Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यासाठी कोलकाताचा संघ सज्ज; थोड्याच वेळात सुरु होणार क्वालिफायर १ चा थरार

KKR vs SRH Qualifier 1 | क्रिकेटप्रेमींनो आजचा दिवस IPL च्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आज कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर १ चा सामना रंगणार आहे. हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला जाणार आहे.

भारतीय वेळेनूसार सायंकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी अर्धा तास आधी नाणेफेक होईल. आज दोन्ही संघ विजयाची पताका रोवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे आता क्वालिफायरमध्ये कोणता संघ कोणावर मात करणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा        –        ‘अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा १०० टक्के प्रचार केला नाही’; श्रीरंग बारणे 

असं असेल प्ले ऑफचं वेळापत्रक :

२१ मे – कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद ( क्वालिफायर १)

२२ मे – राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, अहमदाबाद ( एलिमिनेटर )

२४ मे – क्वालिफायर १ मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, चेन्नई ( क्वालिफायर 2)

२६ मे – क्वालिफायर १ मधील विजेता संघ वि. क्वालिफायर २ विजेता, चेन्नई ( फायनल)

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button