breaking-newsमनोरंजन

जॅकलीनने ‘लवरात्री’ चित्रपट केला प्रमोटच…

सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊस एसकेएफच्या बॅनरखाली बनत असलेला चित्रपट ‘लवरात्री’ ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.  या चित्रपटामध्ये आयुष्य शर्मा आणि वरिना हुसेन मुख्य भूमिकेत आहेत. आपल्या मेहुण्याला प्रमोट करण्याची कोणतीच संधी सलमान खान सोडत नाही. त्याला आता जॅकलीन फ़र्नांडीसची साथ लाभली आहे.

 

जॅकलीनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून पोस्ट करताना लवरात्री चित्रपटातील ‘चोगडा’ यावर गाण्यावर नृत्य केले आहे. यामध्ये तिच्या सोबत अन्य दोन डान्सर देखील आहेत. या गाण्यावर नृत्य करून तिने एकप्रकारे हा चित्रपट प्रमोटच केला आहे.

 

‘लवरात्री’ चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या “रंगतार’ या गाण्याने हॉलीवूड गायक कान्या वेस्ट आणि मारून यांना पिछाडीवर टाकत यूट्यूबवर 24 तासांच्या आत सर्वाधिक पाहिले गेलेल्या गाण्याचा किताब आपल्या नावे केला आहे. याबाबतची घोषणा करताना संगीत निर्माता, गायक, संगीतकार आणि रॅपरने लिहिले की, जगातील पहिल्या नंबरचे गाणे हे “लवरात्री’मधील “रंगतारी’ हे आहे. या यशाबद्‌दल आनंद व्यक्‍त करत हनि सिंग म्हणाला की, ही बाब माझयासाठी निश्‍चित कौतुकास्पद आहे. मी केलेल्या परिश्रमाला यश मिळाल्याने मी समाधानी आहे.

 

या चित्रपटाची कथा आयुष्य शर्मा आणि वरिना हुसेन यांच्या प्रेमाभोवती फिरते. जे गुजराती संस्कृतीशी संबंधित आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा प्रसिद्ध गुजराती लेखक निरेन भट्ट यांनी लिहली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button