कुठे उष्णतेची लाट तर कुठे पाऊस; राज्यातील या भागात उष्णतेची लाट
![Heat wave warning for this part of the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Heat-wave-and-Rain-780x470.jpg)
पुणे | राज्याच्या अनेक भागामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र असे असतानाही हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या काळात वादळ येण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नंदूरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे सांगलीत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा – पुणे शहरात पुन्हा गोळीबार, दोन दिवसांत ३ गोळीबाराच्या घटना
राज्याच्या या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव, नाशिक, रायगड, रत्नागिरी, बीड, सोलापूरला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, नांदेड, लातूर, धाराशिव, ठाणे आणि मुंबईत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी १९ एप्रिल २०२४ रोजी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला उष्णतेच्या लाटेचा देण्यात आला आहे.