Breaking-newsक्रिडा
कम्पाऊन्ड तिरंदाजीत अभिषेकला ब्रॉंझ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/abhishek-varma-.jpg)
सॅमसन (तुर्की) – कम्पाऊन्ड तिरंदाजीतील भारताचा आघाडीचा तिरंदाज अभिषेक वर्माने कोरियाच्या किम जॉंघोवर मात करत मोसमाच्या अखेरच्या तिरंदाजी वर्ल्डकप फायनलमध्ये ब्रॉंझपदकाची कमाई केली आहे. अभिषेकने प्रदर्शनीय कम्पाऊन्ड मिश्र सांघिक स्पर्धेत ज्योती व्हेनमसह रौप्यपदकाचीही कमाई केली. या फायनलमध्ये यजमान तुर्कीने भारतीय जोडीचा 159-152 असा पराभव केला.
मोसमाच्या अखेरीस रंगणाऱ्या या वर्ल्डकप फायनल्समध्ये भारताची आघाडीची तिरंदाज दीपिकाकुमारी सातव्या क्रमांकावर घसरली. दीपिकाने वर्ल्डकप फायनलमध्ये याआधी चारवेळा रौप्यपदकाची कमाई केली आहे.