इराकमध्ये मॉडेलची गोळ्या घालून हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/model.jpg)
बगदाद – इराकची राजधानी बगदादमध्ये इन्स्टाग्राम स्टार असलेल्या मॉडेलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना गुरूवारी बगदाद येथील मध्य भागात घडली. आधुनिक जीवन शैलीमुळे तिची हत्या करण्यात आली. 22 वर्षीय मॉडेल तारा फरेस ही आपल्या पोर्शे कारमधून बगदाद मधील साराह कॅम्प पासून जात असताना तिच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
इराकच्या गृहमंत्रालयाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. फरेस ही आपले टॅटू, केसांना विविध रंग देणे, विविध डिझाईनच्या ड्रेसमुळे खूप चर्चेत असायची. तिचे इंस्टाग्रामवर 27 लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या हत्येनंतर सोशल माध्यमावर तिच्या एका चाहत्याने लिहले आहे.
एक इराकी मॉडेल दुसऱ्या मुलींसारखेच आपल्या जीवनाचा आनंद घेत होती. दुर्दैवाने काही धर्मांध लोकांनी तिची हत्या केली. यामुळे मला मोठे दु:ख झाले आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर जॉर्डन येथे राहणारे व्यंगचित्रकार अहमद अल बशीर यांनी फरेसच्या हत्येवर टिका केली असुन त्यांनी लिहले आहे की, एक मुलगी यासाठी मारली गेली कारण तिने दुसऱ्या अनेक मुलींप्रमाणे जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता.