पिंपरी महापाैरांच्या प्रभागात डासांचा उपद्रव्य वाढला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/TICKLISH-MOSQUITO.jpg)
पिंपरी – इंद्रायणी नदीतील प्रदूषित पाण्यामुळे परिसरात डासांची पैदास वाढल्याने चिखली, जाधववाडी,कुदळवाडी भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचा उपद्रव वाढला असूनही याकडे महापालिका आरोग्य विभागासह स्थानिक असलेले महापाैर राहूल जाधव यांचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच इंद्रायणी नदीत कुजलेली जलपर्णी तत्काळ काढण्याची मागणी नागरिकांकडून होवू लागली आहे.
चिखली, कुदळवाडी आदी परिसरात रसायन व मैलामिश्रित सांडपाणी अनेक ठिकाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात येत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने तसेच उन्हाने वाळलेली जलपर्णी कुजून चालली आहे. या जलपर्णीवर वाहून आलेला कचरा या ठिकाणी साचतो, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. ही कुजलेली जलपर्णी इंद्रायणी नदीबाहेर काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत. जलपर्णी काढून नदीपात्र प्रदूषणविरहीत करण्याची मागणी केली.