शहरात स्वाईन फ्लूने आणखी एकाचा मृत्यू
पिंपरी (महा ई न्यूज) – शहरात स्वाईन फ्लूने आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरामध्ये 27 रुग्णांचा मृत्यू झाला असून 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जाहीर केली आहे.
मोशी येथील 58 वर्षीय महिलेला स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळल्यानंतर शुक्रवारी (दि. 14) शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. स्वाईन फ्ल्यूचा त्रास वाढल्याने त्यांना रविवारी (दि. 16) कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. रविवारी (दि. 16) त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु, उपचार सुरु असतानाच त्यांचा मंगळवारी (दि. 18) मृत्यू झाल्याचे वैद्यकीय विभागाने कळविले आहे.
स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळताच तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे, तसेच डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये तीन रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे.