भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार का? माधुरी दीक्षित म्हणाली..

Madhuri Dixit | बॉलीवुड अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत स्वत: माधुरी दीक्षितने प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी-चिंचवडमधील पीएनजी ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राजकारणात येण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर माधुरी दीक्षित म्हणाली की, याबाबत मला खूपवेळा विचारले जाते. मी एक कलाकार आहे. कला हे माझे क्षेत्र आहे. त्यात मला रस आहे. राजकारण माझे क्षेत्र नाही.
हेही वाचा – महाशिवरात्रीला घ्या महादेवाचं दर्शन? जाणून घ्या १२ ज्योतिर्लिंगे कुठं आहेत?
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून ऑफर आहे का? असे विचारले असता, ‘मी ते तुम्हाला का सांगू’ असे म्हणत निवडणूक लढविण्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.
दरम्यान, भाजपकडून अभिनेते, अभिनेत्री यांना लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील एका जागेवर माधुरी दीक्षितला निवडणुकीत उतरविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.





