भाजपची मोठी खेळी, राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Untitled-design-55-780x470.jpg)
मुंबई : दक्षिण मुंबईवर भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेक यांना थेट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरवण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकर यांना निवडणूक लढण्याचे आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अरविंद सावंत यांच्याविरोधात नार्वेकर मैदानात उतरणार असल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा – ‘परकीय थेट गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्र आघाडीवर’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी उच्च वर्गीय आणि मुस्लिम नागरिकांचं प्राबल्य आहे. या भागात मराठी उमेदवार अनेकवेळा निवडून आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सध्या इथले खासदार आहेत. आणि त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याचं समोर येत आहे. राहुल नार्वेकर हे कोकणी , मराठी चेहरा आहे. त्यामुळे त्यांना या भागात निवडणुकीसाठी उतरवण्यास भाजप सज्ज झालं आहे. त्या अनुषंगाने नार्वेकर यांनी अनेक कार्यक्रमासही सुरूवात केली आहे. दक्षिण मुंबईचा हा मतदारसंघ घेण्यासाठी भाजपतर्फेही विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.