Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
…त्या मुलीला श्रध्दांजली वाहण्यासाठी पिंपरीत कॅण्डल मार्च
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/IMG-20180927-WA0014.jpg)
पिंपरी (महा ई न्यूज) – हिंजवडी, कासारसाई येथे गेल्या आठवड्यात नराधमांनी केलेल्या बलत्काराच्या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. त्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आणि शहरातील इतर सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने गुरुवारी (दि. 27) पिंपरीत कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी सर्वांनी मृत्यू पावलेल्या मुलीला श्रद्धांजली अर्पण केली. श्रध्दांजली सभेत मान्यवरांनी तिव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.