ताज्या घडामोडी
एकता प्रतिष्ठाण डोणे यांच्या दिनदर्शिकेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते प्रकाशन
मावळ (Pclive7.com):- एकता प्रतिष्ठाण डोणे यांच्या कालदर्शिका 2024 चे तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आमदार सुनील शेळके यांनी एकता प्रतिष्ठाण डोणे करत असलेल्या सामाजिक कार्याची सर्व माहिती वाचली. आणि ग्रामीण भागात एकता प्रतिष्ठाण करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोर सातकर, पाचाणे गांवचे माजी सरपंच- छबन महाराज कडु, पवनमावळ वारकरी सांप्रदायचे अध्यक्ष विठ्ठल येवले, आढले बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नामदेवराव घारे पाटील, सरचिटणीस चंद्रकांतभाऊ चांदेकर, माजी उपसरपंच पोपट वाडेकर, नथु कारके, सखाराम आरुठे, बाळु घारे (सिनिअर), विलास वाघमारे, पोलीस मिञ संघटनेचे सचिव संदिप लांडगे, राष्ट्रवादी डोणेचे अध्यक्ष राहुल घारे पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर खिलारी, ग्रामपंचायत सदस्य समीर खिलारी, एकता प्रतिष्ठाणचे संस्थापक बाळासाहेब घारे पाटील, उपाध्यक्ष रविंद्र काळभोर, सदस्य कार्याध्यक्ष विशाल कारके, सोमनाथ खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते.