IND vs ENG 2nd Test | टीम इंडिया १०६ धावांनी विजयी
विशाखापट्टणम : इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना टीम इंडियाने चौथ्याच दिवशी जिंकला आहे. टीम इंडियाने इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंड २९२ धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने या विजयासह पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली. तसेच ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.
CASTLED! ⚡️⚡️
Jasprit Bumrah wraps things up in Vizag as #TeamIndia win the 2nd Test and level the series 1⃣-1⃣#TeamIndia | #INDvENG | @Jaspritbumrah93 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/KHcIvhMGtD
— BCCI (@BCCI) February 5, 2024
हेही वाचा – सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण, नवे दर काय?
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन: : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.