खासदार इम्तियाज जलील यांचं वीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले..
![Imtiaz Jalil said that he will never accept rascals like Savarkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Imtiaz-Jaleel-780x470.jpg)
मुंबई | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. इम्तियाज जलील यांनी वीर सावरकरांचा उल्लेख भगौडे म्हणजेच पळपुटे असा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. ते परभणी येथे संविधान गौरव सोहळ्यात बोलत होते.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, आमचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखत आणि भाजपाच्या ३६० खासदारांसमोर सांगितलं की आपल्या देशात फक्त एकच महापुरुष होऊन गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच ते नाव आहे. भाजपाच्या नेत्यांनी हे मान्य केलं नाही, कारण त्यांच्या मते एकच महापुरुष ते म्हणजे सावरकर. पण ऐसे भगौडे को हम कभी माने हैं ना मानेंगे. (सावरकरांसारख्या पळपुट्यांना कधीही मानणार नाही.), असं इम्तियाज जलील म्हणाले.
हेही वाचा – ‘मुनावर फारुकी’ ठरला बिग बॉसचा महाविजेता! मिळाले तब्बल इतके लाख रुपये
दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटल्याने नव्या वादाला सुरूवात झाली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. इम्तियाज जलील यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, ही औरंगजेबाची आणि निजामाची अवलाद आहे. त्यांना वीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असण्याचे कारण नाही. अशा निजामाच्या अवलादींकडे आम्ही लक्ष देत नाही. वीर सावरकर हे राज्याचेच नाही तर देशाचे दैवत आहेत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.