‘आमच्या गाड्या अडवल्यास गृहमंत्र्यांच्या घरासमोर बसणार’; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
![Manoj Jarange said that if our cars are blocked, he will sit in front of Devendra Fadnavis' house](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Manoj-Jarange-Patil-and-Devendra-Fadnavis-2-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवली सराटी येथून २० जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. मनोज जरांगेंनी आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जाव्या लागणार आहेत. त्यामुळे सगळी वाहनं बाहेर काढावीत. कुणाच्याही वाहनांना धक्का लागणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पोलिसांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला, तर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू.
हेही वाचा – ‘नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी बाशिंग बांधून तयार’; काँग्रेस नेत्याचं विधान
मुंबईला जाण्याचा मार्ग कसा?
जालना जिल्हा
अंतरवाली सराटी येथून सुरूवात
बीड जिल्हा
शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, तांदळा, मातोरी, खरवंडी
अहमदनगर जिल्हा
पाथर्डी, तीसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव
पुणे जिल्हा
सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजगणाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, शिवाजीनगर, पुणे-मुंबई एक्स्प्रेसमार्गे लोणावळा
मुंबई
पनवेल, वाशी, चेंबूर, आझाद मैदान.