केंद्र सरकारची मोठी कारवाई! जम्मू काश्मीरमधील मुस्लीम लीग मसरत गटावर बंदी
![Muslim League Masrat group banned in Jammu and Kashmir](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Narendra-Modi-and-Amit-Shah-2-780x470.jpg)
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील मुस्लीम लीग मसरत आलम गटावर मोदी सरकारने बंदी घातली आहे. यूएपीए कायद्याअंतर्गत या संघटनेवर कारवाई करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार मसरत आलम भट यांच्या अध्यक्षतेखालील एमएलजेके-एमए या संघटनेने अनेकदा भारताचा विरोध आणि पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. काश्मीरला भारतापासून वेगळं करणे आणि पाकिस्तानमध्ये विलीन करणे, हे या संघटनेचं मुख्य उद्दीष्ट आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कारवाईची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भारत सरकारने मुस्लीम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) एमएलजेके-एमए ही बेकायदेशीर संघटना असल्याचं घोषित केलं आहे. ही संघटना आणि त्यांचे सदस्य जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रविरोधी आणि फुटीरतावादी कारवाया करत आहेत. ते दहशतवादी कारवायांचं समर्थन करतात.
हेही वाचा – साईभक्तांसाठी महत्वाची बातमी! आजपासून शिर्डीत ‘नो मास्क नो दर्शन’
The ‘Muslim League Jammu Kashmir (Masarat Alam faction)’/MLJK-MA is declared as an 'Unlawful Association' under UAPA.
This organization and its members are involved in anti-national and secessionist activities in J&K supporting terrorist activities and inciting people to…
— Amit Shah (@AmitShah) December 27, 2023
जम्मू काश्मीरमध्ये इस्लामवादी राजवट स्थापन करण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्ये करतात. ही कारवाई म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा मोठा आणि स्पष्ट संदेश आहे. आपल्या राष्ट्राची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात काण करणाऱ्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. अशा प्रत्येकाला आपल्या कायद्याचा सामना करावा लागेल, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
मसरत आलम कोण आहे?
द हिंदूच्या वृत्तानुसार मसरत आलम हा २०१० मध्ये काश्मीर खोऱ्यात कथित स्वातंत्र्यासाठी केलेल्या आंदोलनाचा मुख्य संयोजक होता. त्यावेळी काश्मीर खोऱ्यात मसरत आलम आणि त्याच्या संघटनेने निदर्शने केली होती. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. २०१५ मध्ये त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली.