breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
माजी नगरसेविका शोभा आदियाल यांचे निधन
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेविका शोभाताई गुरमितसिंग आदियाल (वय – ६५) यांचे आज सकाळी जुपिटर रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगी ,तीन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
हेही वाचा – बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी केली मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाकड पिंपळे गुरव प्रभागातून २०१२ मध्ये त्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर नगरसेविका झाल्या होत्या. महिला बाल कल्याण सभापती आणि झोप़डपट्टी सुधार समिती सदस्या म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आज सायंकाळी चार वाजता पिंपळे गुरव येथील स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत.