पुण्यात स्कूलबस अपघाताचा थरार; विद्यार्थ्यांनी भरलेली भरधाव बस झाडावर आदळली
Pune Accident : पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कुलची बस झाडावर आदळल्याने भिषण अपघात झालाय. बस झाडावर आदळल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालक वर्गाकडून केला जात आहे याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहे.
हेही वाचा – मुलीच्या उज्ज्वल सुरक्षित भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना ठरतेय फायद्याची
#Pune: A school bus in #Wagholi collided with a tree, resulting in injuries to several students who are now receiving treatment at a private hospital #Accident #PuneNews pic.twitter.com/B23k5u4rTB
— Free Press Journal (@fpjindia) December 5, 2023
सीसीटीव्ही फुटेजवरून या अपघातासाठी बसचा ड्रायव्हर जबाबदार असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे आरटीओने या बस ड्रायव्हरवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.