ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमुंबई

मुंबई-पुणे दरम्यान आज मेगा ब्लॉक!

देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी दोन तास वाहतूक बंद

पिंपरी: मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक गुरुवारी (दि. 23) दुपारी बारा ते दोन या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. गुरुवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मॅजिक पॉइंट येथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका येथे. अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येणार आहेत. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट येथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका येथे अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येणार आहे.

अडचणीसाठी करा संपर्क –
गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी दोन वाजता द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी (9822498224) अथवा महामार्ग पोलीस विभागाशी (9833498334) संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button