Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अनिसचा विरोध

पुणे : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२३ दरम्यान या तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन पुण्यातील भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी संगमवाडी येथे केले आहे. या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध दर्शविला आहे. अनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलींद देशमुख यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे कार्यक्रम होऊ नये अशी मागणी केली आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आजवर अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये येणार्‍या लोकांना भविष्य सांगणं, चमत्काराचे दावे केले आहेत. त्यामुळे पुण्यात होणार्‍या कार्यक्रमात देखील असाच प्रकार घडणार आहे. तसेच आपल्या राज्यात जादूटोणा विरुद्ध कायदा असून अशा प्रकारचे दावे करणाऱ्या विरोधात कारवाई होऊ शकते आणि कारवाई झाली पाहिजे, असं मिलींद देशमुख यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – दोन समाजांना भिडवण्याचं कारण काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल 

समाजात अंधश्रद्धा पसरविण्याच काम धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे करीत आहेत. अनेक कार्यक्रमामध्ये महिलांबाबत अपशब्द बोलत राहत आले आहेत. यातून दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य आजपर्यंत करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी देऊ नये, जर या कार्यक्रमाला परवानगी दिली तर आम्ही विरोध दर्शविणार असल्याचा इशारा भीम आर्मी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांनी पोलीस प्रशासनाला यावेळी दिला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button