Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

‘मी विराटचं अभिनंदन का करू?’ कुसल मेंडिसच्या विधानावर चाहते भडकले

मुंबई : काल भारतीय संघाने वर्ल्डकपमधील सलग आठवा विजय मिळवला. विराटने कारकिर्दीतलं ४९वं शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यामुळे विराटचं सगळेच कौतुक करत आहेत. मात्र दुसरीकडे श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने विराटचं अभिनंदन का करू? असा सवाल उपस्थित केला आहे.

आज श्रीलंकेचा बांगलादेशविरूद्ध सामना खेळला जाणार आहे. त्याच्या पुर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसला ‘विराट कोहलीनं कारकिर्दीतलं ४९वं शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विक्रामाशी बरोबरी केली आहे. तू त्याचं अभिनंदन करशील का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ‘मी विराटचं अभिनंदन का करू?’ असा उलट सवाल मेंडिसनं केला.

हेही वाचा – थोड्याच वेळात ठरणार गावचा कारभारी? कोणत्या पक्षाचं होणार पारडं जड?

दरम्यान, कुसल मेंडिसच्या या विधानवर भारतीय क्रिकेट चाहते चांगलेच भडकले आहेत. काहींनी श्रीलंका यंदाच्या विश्वषचकात तळाशी असण्याला हीच बाब कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button