Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘एकता फाउंडेशन ट्रस्ट’च्या वतीने नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान

पिंपरी : नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो. महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशातील विविध भागांत नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. नवरात्री मध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. बांदल वस्ती कुरुळी येथील एकता फाउंडेशन ट्रस्टने नवरात्र उत्साहात, आनंदाने साजरी केली अशी माहिती आम आदमी पार्टीचे संघटन मंत्री व फाउंडेशनचे अध्यक्ष वाजिद शेख यांनी दिली.

बांदल वस्ती येथे नवरात्री निमित्त महिलांसाठी दररोज दांडिया तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर शेवटच्या दिवशी एकता फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ठ दांडिया खेळणाऱ्या महिलांना पैठणी भेट देण्यात आली.

हेही वाचा – चिखलीसह समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा सक्षम!

कार्यक्रमात अध्यक्ष वाजिद शेख, उपाध्यक्ष प्रविन निकम, सचिव ज्ञानदेव शिंदे, खजिनदार युवराज भोसले, स्वप्निल मेदनकर, सोपान मोरे, योगेश मोटे, महेंद्रसिगं प्रजापति, श्रीकांत अंबुरे, भरत रसाळ, प्रकाश दाभाडे, साईनाथ मुऱ्हे, कालिदास मुऱ्हे, महेश मुऱ्हे, गणेश मुऱ्हे, सूर्यकांत खटिंग, प्रवीण गायकवाड, परसु अण्णा गाढवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button